मुरुडमध्ये स्वच्छता मोहीम

। आगरदांडा । प्रतिनिधी |

मुरुड वसंतराव नाईक महाविद्यालयाचे एन.एस.एस. युनिट ई 10 च्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री परिसर स्वच्छ केला.

यावेळी एन.एस.एस. अधिकारी डॉ. श्रीशैल बहिरगुंडे, डॉ.सुभाष म्हात्रे, गजानन मुनेश्‍वर, आदिंसह विद्यार्थी या स्वच्छता मोहिमेत उपस्थित होते. डॉ.बहिरगुंडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की स्वच्छता ही राष्ट्र सेवा आहे शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत प्रत्येकांनी प्रयत्न केले पाहिजे स्वच्छता हीच राष्ट्र सेवा आहे. घरातील कचरा उघडयावर किंवा गटरात न टाकता पालिकेच्या कचरा गाडीमध्ये टाकले तर रोगराई होणार नाही आणि आपला शहर स्वच्छ व सुंदर दिसेल असे मत त्यानी व्यक्त केले.

Exit mobile version