एमएमबी मार्फत स्वच्छता मोहिम

। अलिबाग । प्रतिनिधी ।

किनारे स्वच्छ राहिले पाहिजे हा उद्देश समोर ठेवून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड तथा एमएमबी विभागाने नुकतीच स्वच्छता मोहिम समुद्रकिनारी राबवली आहे. अलिबागमधील समुद्रकिनारी पडलेला कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्याचे काम या विभागामार्फत करण्यात आले. ‘स्वच्छता हीच सेवा’ हा ध्यास घेत या उपक्रमात कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘स्वच्छता हीच सेवा’ हे अभियान 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येते आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगलमुगले यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग समुद्रकिनारी गुरुवारी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि विविध व्यावसायिकांच्या विद्यमाने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. स्वच्छता मोहिमेचे नियोजन अलिबागचे बंदर निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्फत करण्यात आले. समुद्रकिनार्‍यावर पडलेला कचरा गोळा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. या अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कर्मचार्‍यांसह व्यवसायिकांनी स्वयंस्फुर्तीने या अभियानात सहभाग घेऊन संपुर्ण अलिबागमधील समुद्रकिनारी स्वच्छ केला.

Exit mobile version