| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहरातील मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या अमरधाम स्मशानभूमीची दुरवस्था लक्षात घेऊन अखेर साफसफाई कामाला सुरुवात झाली आहे. स्थानिक शिवसेना नेते चंद्रशेखर सोमण यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा विषय महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणला होता. 11 ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था, प्रकाशयोजना, शववाहिनी यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव अधोरेखित केला होता. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी पुनश्च स्मरणपत्र देत तातडीची कारवाईची मागणी करण्यात आली. यानंतर महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी तात्काळ कार्यवाही करत स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम सुरू केली. यावेळी सर्व प्रमुख स्मशानभूमीची महिन्यातून दोनदा स्वच्छता करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच, 24 तास सुरक्षारक्षक व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
अमरधाम स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम

Oplus_16908288