किल्ले मदगडावर स्वच्छता मोहिम

| बोर्लीपंचतन । मकरंद जाधव |

गिरीमित्र प्रतिष्ठान मुंबईच्यावतीने श्रीवर्धन तालुक्यातल्या वांजळे गावाजवळच्या वनदुर्ग मदगड किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. ‘गिरीदुर्ग संवर्धनाय च: समर्पितम’ हे ब्रीद घेऊन महाराष्ट्रातल्या गडदुर्गांच्या संवर्धनाचा वसा घेतलेल्या गिरीमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश कोयंडे यांच्या नेतृत्वाखाली राजू गोळे, शहाजी घाग, हेमंत लाड, मंगेश ठाकूर, अनिश खाडे, आरती गुरव या मावळ्यांनी मदगड किल्ल्याच्या संवर्धन मोहिमेअंतर्गत गडावरच्या अंतर्गत वाटांमध्ये उगवलेली छोटी झुडपं तोडून काही वाटा मोकळ्या केल्या. गडावरच्या काही भग्न अवशेषावर कित्येक वर्ष साठलेला पालापाचोळा बाजूला करून अवशेषांचं मूळ रूप समोर आणण्याचा प्रयत्न केला. या मोहिमेमध्ये वांजळे ग्रामस्थ भालचंद्र जाधव, गजू भाटकर, आत्माराम गायकर यांनी मावळ्यांचं कौतुक केले.

Exit mobile version