| रसायनी | वार्ताहर |
पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट आणि महात्मा एज्युकेशन सोसायटी संचालित एचओसीएल इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने खालापूर तालुक्याची जीवनदायी म्हणून ओळखली जाणारी पाताळगंगा नदीची स्वच्छता करण्यात आली. यावेळी कृतज्ञा म्हणून नदीचे पूजन करण्यात आले. याशिवाय पाताळगंगातील वडगाव, दांडवाडी, तळवली आदिवासीवाडी, आंबिवली येथील भैरवनाथ मंदिर परिसरात साफसफाई केली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अरुण जाधव, निलेश जाधव, कलावती उपाध्याय उपस्थित होते.






