।चिरनेर । प्रतिनिधी ।
संत निरंकारी सत्संग मिशन यांच्या समाजिक प्रबोधनच्या माध्यमातून रविवारी (दि.25) सत्संग मिशनच्या उरण पूर्व विभागातर्फे स्वच्छता अभियान उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने सोरला तलाव परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच, येथील रस्त्यांचीही स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता अभियानात सत्संगच्या बंधु भगिनी, जेष्ठ नागरिक, तरुण युवक-युवतींनी आपला सहभाग नोंदवून स्वच्छता अभियान यशस्वी करण्यात मदत केली.
चिरनेरला स्वच्छता अभियान
