। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग येथील क्षात्रैक्य समाज संस्था, लायन्स क्लब अलिबाग, लायन्स हेल्थ फाउंडेशन आणि ‘दोस्त’ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कुरुळ येथील भव्य वातानुकूलित क्षात्रैक्य समाज सभागृहात पोटाचे आजार, शौचाशी निगडित समस्या, पोटातील कर्करोग, यकृत, पित्ताशय, किडनी यांच्याशी निगडित समस्या, शल्यचिकित्सा, हर्निया, स्तन, थायरॉइडच्या समस्या, शरीरावरील गाठी, पायांचे दुखणे, व्हेरिकोज व्हेन्स, रक्तदाब आदी तपासणीसह तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने मोफत वैद्यकीय उपचार आणि औषधे देण्यात आली. यामध्ये शस्त्रक्रियेची आवश्यकता असणार्या तसेच मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा हे नेत्रविकार आढळलेल्या रुग्णांना पुढील मोफत उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी क्षात्रैक्य समाज अध्यक्ष द्वारकानाथ नाईक, जिल्हा उपप्रांतपाल प्रवीण सरनाईक, लायन्स अध्यक्ष अॅड गौरी म्हात्रे, सचिव महेश कवळे, खजिनदार अंकिता म्हात्रे, आरसी विजय वनगे, फर्स्ट व्हीपी तथा क्षात्रैक्य समाज सचिव प्रदीप नाईक, लायन नयन कवळे, रवींद्र वर्तक, अविनाश राऊळ, श्रीनाथ कवळे, मनोज राऊळ, मोहन वर्तक, तुषार नाईक, अतुल वर्तक, गिरीश म्हात्रे, जगदीश कवळे, रमेश पाटील, सुरेंद्र नागलेकर, अॅड प्रसाद पाटील, जगदीश कवळे, रमेश नाईक, प्रकाश पाटील, संजय माळी, संतोष पाटील, महेंद्र पाटील, शैलेश घरत, अॅड भूपेंद्र पाटील, प्रकाश देशमुख यांसह डॉ. शुभदा कुडतलकर, डॉ. कांचन माळवी, त्यांचा संपूर्ण वैद्यकीय स्टाफ, दोस्त मुंबईचे जनसंपर्क अधिकारी श्रीकांत गावीत उपस्थित होते. या मोफत नेत्रतपासणी आणि आरोग्य शिबिराचा 187 गरजू रुग्णांनी लाभ घेतला. तज्ज्ञांकडून तपासणी आणि मोफत औषधोपचार उपलब्ध झाल्याने अनेक रुग्णांनी समाधान व्यक्त करुन, अशाप्रकारची आरोग्य शिबिरे वारंवार व्हावीत अशी माफक अपेक्षा व्यक्त केली.