गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धावरी नदीची स्वच्छता

| चौक | वार्ताहर |

जुना मुंबई-पुणे हायवे रोडवर असलेल्या धावरी नदीची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम करण्यात आली. मोरबे धरणाची बांधणी झाल्यापासून या नदीत पावसाळ्यात सुद्धा पाणी वाहत नाही. गणेशोत्सवात घरोघरी पुजलेल्या गणेश मूर्ती, गौरी दीड दिवसाचे, पाच दिवसाचे, दहा दिवसाचे मूर्तींचे विसर्जन करण्यात येते. नदीत योग्य पद्धतीने गणेश मूर्ती व नवरात्रासाठी योग्य प्रकारे विसर्जन करण्यासाठी चौक ग्रामपंचायत सरपंच रितू सुधीर ठोंबरे तसेच उपसरपंच राजन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या धावरी नदीतील गाळ काढण्यात आला आहे. पाणी निचरा होण्यासाठी व स्वच्छ पाण्याचा साठा जमा होण्यासाठी जेसीबीच्या साह्याने नदीपात्रात बंधारा घालून गणेशोत्सवापूर्वी नागरिकांसाठी योग्य सोय करून दिली आहे. हे काम योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी चौक ग्रामपंचायतचे सदस्य निखिल मालुसरे, दत्ता भोईर, तनवीर शेख, निशिकांत जाधव यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version