। माथेरान । वार्ताहर ।
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या प्रशासक तथा कार्यक्षम मुख्याधिकारी सुरेखा भणगे- शिंदे यांनी गणेश विसर्जन स्थळाची पाहणी अधिकारी, कर्मचारी वर्गा सोबत (दि.30) ऑगस्ट रोजी केली. यावेळी येथील वॉटर टँक या ठिकाणी सर्वच गणेश विसर्जन करण्यात येते. त्याचप्रमाणे मागील काही वर्षांपासून इंदिरा गांधी नगर येथील (गळती) हरिसन स्प्रिंग या ठिकाणी त्या भागात विसर्जन करण्यात येत त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. तसेच विद्युत पुरवठा, रस्त्यांची साफसफाई बाबत त्यांनी कर्मचारी वर्गाला सूचना करण्यात आल्या. यावेळी नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता स्वागत बिरंबोले, अंकुश इचके, पाणी पुरवठा अधिकारी अभिमन्यु येळवंडे, अन्सार महापुळे, ज्ञानेश्वर सदगीर उपस्थित होते.