कुंडलिका नदी परिसराची स्वच्छता

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील उडदवणे गाव परिसरातील तरूणांनी स्थापन केलेल्या शिवछत्रपती प्रतिष्ठान उडदवणे यांच्यावतीने कुंडलिका नदी व परिसराची स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवून नदी संवर्धन व परिसर स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे टाकले.

गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शिवछत्रपती प्रतिष्ठान उडदवणे या प्रतिष्ठानची स्थापना एका चांगल्या हेतूने करण्यात आली असून सामाजिक बांधिलकी जपून महिन्यातील काही दिवस आपला समाज व देशहितासाठी खर्ची करण्याचा या प्रतिष्ठानचा उद्देश असून त्याच उद्देशाने पहिलाच स्वच्छतेचा उपक्रम हाती घेऊन नदी स्वच्छता, पालदाड पूल व रस्त्यालगत वाढलेली व अपघातास कारणीभूत ठरणारी झाडी झुडपे तोडून, तसेच परिसरात ठिकठिकाणी पडलेल्या काचेच्या बाटल्या गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लाऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

Exit mobile version