तहसील कार्यालयाची स्वच्छता

| माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील जे. बी. सावंत एज्युकेशन सोसायटीचे, टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेज माणगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी बुधवार (दि.19) स्वच्छता अभियान राबवले. या अभियानात तहसील कार्यालय परिसरातील प्लास्टिक बाटल्या, पिशव्या त्याचप्रमाणे प्लास्टिकच्या विविध वस्तू गोळा केल्या तसेच तहसील कार्यालयातील संपूर्ण परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी साफसफाई केली. त्यानंतर नगरपंचायतीच्या कचरा गाडीमध्ये हा कचरा टाकून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. दोन ते अडीच तास संपूर्ण परिसराची साफसफाई केल्यानंतर अंदाजे तीन ते चार किलो पेक्षा अधिक प्लास्टिक वेस्टेज आणि इतर कचरा जमा केले. निवासी नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी माणगाव बी. वाय. भाबड यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या या कामाबद्दल कौतुक केले.

Exit mobile version