। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत पंचायत समितीच्यावतीने कोंढाणे लेणी स्वच्छ्ता रॅली आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत 36 बाईक आणि सहा चारचाकी वाहनांचा सहभाग होता. रॅलीमधील सर्व वाहनांचे स्वागत कर्जत-कोंदिवडे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी केले. रॅलीचे नेतृत्व विस्तार अधिकारी उज्वला भोसले, एन.एस. पोतकुले, कृषी अधिकारी चिंतामण लोहकरे, अभिजित खैरे, राठोड यांनी केले.\ 100 हुन अधिक सरकारी कर्मचार्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने कोंढाणे लेणी परिसरातील प्लास्टिक बॉटल, कचरा संकलन केले. तसेच सर्व कचरा एकत्रित करून कोंदिवडे ग्रामपंचायत संकलन केंद्रात जमा कण्यात आला. रॅली दरम्यान 40 बांबू रोपांची लागवड गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांचे हस्ते करण्यात आली. त्यावेळी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी सहभागी झाले होते.