| मुंबई | प्रतिनिधी |
गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय वर्तुळात शरद पवार हे भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएसोबत जाणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. मध्यंतरी पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट झाल्यामुळे या चर्चांना आणखीनच हवा मिळाली होती. मात्र, सोमवारी (दि.28) मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात शरद पवार यांनी आपण एनडीएसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यासोबतच शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि अजित पवार गटाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांना अप्रत्यक्षरित्या संदेश दिला. ते म्हणाले की, आपल्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मला त्यांना सांगायच आहे. आपण कुठेही जाणार नाही. आम्ही कुणासोबत जाणार नाही. यायचं असेल तर आमच्यासोबत या, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात शरद पवार यांचा पक्ष राज्यात महाविकास आघाडी आणि देशपातळीवर इंडिया आघाडीसोबत राहून काम करेल, हे स्पष्ट झाले आहे.
एनडीएसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट
