लिपिक संवर्गाचे कामबंद आंदोलन

| पनवेल | प्रतिनिधी |

जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना पनवेल तालुका शाखेच्यावतीने लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी असहकार व बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे. संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना वेतनातील विसंगती दूर करून सुधारित वेतनश्रेणी लागू करणे, सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच पदनामात बदल करून पदोन्नतीची साखळी कमी करणे या मुद्द्यांचा समावेश आहे. या आंदोलनामुळे शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Exit mobile version