नेरळमध्ये सीएनजी कारला आग

। नेरळ । प्रतिनिधी ।
माल वाहतूक करणार्‍या सीएनजी ओम्नी कारला आग लागल्याची घटना नेरळमध्ये घडली. वेळीच स्थानिकांच्या सतर्कतेने व नेरळ पोलिसांच्या मदतीने ही आग विझवण्यात यश आल्याने पुढील मोठी दुर्घटना होता टळली.वाहनात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. नेरळ येथे राहणारे रुपेश रेवनकर यांच्या मालकीची असलेली सीएनजी ओम्नी कार हे मालवाहून घेऊन जात असताना, नेरळ हेटकरआळी येथे एचडीएफसी बँक जवळ अचानक गाडीतून धूर निघायला लागल्याने वाहन चालकाने वाहन जागीच उभे करून चालक बाजूला गेला असता स्थानिक नागरिक यांनी पाण्याच्या वापर करून ती आग विझवली. यावेळी नेरळ पोलीस देखील हजार झाले होते. स्थानिक नागरिक व पोलीस यांनी तत्परता दाखवल्याने वाहनचालकाचे नुकसान टळल

Exit mobile version