। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ येथील खासगी माऊली मेडिकल दुकानाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीच्या दाहकतेने मेडिकल दुकानातील औषधांचा साठा व अन्य वस्तू मिळून सहा लाखाचे नुकसान झाले. परंतु स्थानिकांच्या सतर्कतेने पुढील मोठी दुर्घटना होता टळली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
नेरळ मुख्य बाजापेठ तसेच कायम रहदारीचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे टेपआळी येथील शिवरत्न महाले चौक येथे विवेक दहिवलीकर यांच्या मालकीचे खासगी माऊली मेडिकल दुकानाला रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आग लागली. दहिवलीकर हे मेडिकल दुकान लवकर बंद करून कामासाठी बाहेर गेले होते.अचानक लागलेल्या या आगीने धुराचे लोट दुकानाच्या शटरमधून बाहेर पडू लागल्याने स्थानिकांच्या निदर्शनास आले असता, आगीच्या दाहकतेने दुकानातील औषधांचे व अन्य साहित्याचे नुकसान झाले. यात पाच लाखाच्या मेडिसिन औषधांचा साठा व अन्य साहित्य मिळून सहा लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे मेडिकल दुकानाला लागून किराणा मालाचे दुकान तर वरच्या बाजूस बँक आहे. रहदारीच्या या रस्त्यावर उपस्थित स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्याने ही बाब उघडकीस आली.