को.ए.सो. इंदुबाई वाजेकर शाळेत गुणवंताचा सत्कार

। पनवेल । वार्ताहर ।
को.ए.सो. इंदुबाई वाजेकर इंग्रजी माध्यम शाळेत दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांनाच सत्कार समारंभ संप्पन झाला या कार्यक्रमाला शाळा समितीने चेअरमन व्ही. सी. म्हात्रे सर, शाळा समिती सदस्य नंदकुमार वाजेकर, विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, अंजली उर्‍हेकर, देशपांडे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मानसी कोकीळ उपस्थित होत्या.

शाळेचा एकूण निकाल 988% लागला. 70 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले. सृष्टी विनोद ठाकूर हिने 481 / 500 गुणांसह प्रथम क्रमांक, गायत्री विनोद मुकादमे 479/500 गुणांसह तृतीय क्रमांक संपादन केला. कार्यक्रमाचे प्रस्तविक मुख्याध्यपिका मनीषा पाटील यांनी केले. या प्रसंगी शाळेच्या गुणवान विद्यार्थ्यांनी वैखरी पोटे आणि नित्या पाटील यांनी गोवा येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय भरतनाट्यम स्पर्धेत वैयक्तिक प्रथम क्रमांक, समूहनृत्य द्वितीय क्रमांक संपादन केल्याबद्दल, त्यांचाही सत्कार करण्यात आला.या कर्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती शिंदे आणि आभार प्रदर्शन आजमा शिरगावकर यांनी केले.

Exit mobile version