कॉ.अरविंद नाचणे यांचे निधन

। मुंबई । प्रतिनिधी ।
कॉ. अरविंद नाचणे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. नाचणे कुटुंबियाचे राष्ट्रसेवा दलाचे नाते घनिष्ठ हेाते. कॉ अरविंद नाचणे जेवढे समाजवादी परिवारात जवळचे तेवढेच त्यांचे कॉ डांगे यांच्याशी जवळीक हेाती. कॉ नाचणे यांचे कर्तृत्व विमा व्यवसायाचे राष्ट्रीय करण यशस्वी करणे व कर्मचारी समूहांचे हित संबंध सुरक्षित करणे यांत अव्वल दर्जाचे हेाते. सरकारी कर्मचारी, बँक व विमा कर्मचारी याच बरेाबर कामगार संघटना संयुक्त कृति समितीमध्ये त्यांनी मध्यमवर्गातील पांढरपेशा श्रमिकांचा सहभाग वाढविण्याची गरज सातत्याने मांडली. कॅा कर्णिक, शांती पटेल, कॅा. ग. वि. चिटणीस यांच्या समवेत कामगार चळवळ क्रियाशिल व लढाऊ पायावर उभी करणे हे त्यांचे सर्व चळवळीत उद्दिष्ट हेाते. प्रबेाधन व संघर्षाचे कार्यक्रम त्यानी सतत हाती घेतले हेाते. महाराष्ट्र टाइम्स व लेाकसता मध्ये सातत्य पूर्ण लिखाण ते करीत विमा कामगाराकरिता चार दशके त्यानी व्यापक लिखाण केले.

Exit mobile version