| सांगली | प्रतिनिधी |
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या कॉमे्रड वृदा करात यांना यंदाचा क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या 122व्या जयंतीनिमित्त रविवारी विटा येथे पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा पुरस्कार प्रा. विश्वासराव साईनाकर, तारा भवाळकर यांच्या हस्ते देण्यात आला.
याप्रसंगी आमदार अरुण अण्णा लाड, सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, कॉम्रेड अजित अभ्यंकर, अॅड. सुभाष पाटील, इंद्रजीत पाटील, सुभाष पवार, अॅड. नानासाहेब पाटील, रघुनाथ पाटील, बाबुराव गुरव, अविनाश कुलकर्णी, भाई मोहन गुंड केज बीड, भाई अॅड. नारायण गोले पाटील माजलगाव, भरत किनोळकर, विजय वाकणकर, धनंजय पाटील उस्मानाबाद, भाई बाबुराव जाधव कळंब, शंकरराव पाटील मुंबई, प्राध्यापक लगारे, अॅड. कृष्णा पाटील, भाई संपतराव पवार, अॅड. दीपक लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वृंदा करात यांनी, नक्की देशात सुरू तरी काय आहे? केंद्र शासन कशा पद्धतीने संविधानाची पायमल्ली करण्याचे प्रयत्न करत आहे. सरकार गोरगरिबांमध्ये जातीय व धर्माच्या दुफळ्या निर्माण करून स्वतःच्या व उद्योगपतींच्या भाकर्या भाजत आहे. ज्यांनी स्वातंत्र नंतर तिरंग्याचा विरोध केला ते आज हर घर तिरंगाचा नारा देत आहेत, असे परखड मत मांडले.