कोल्ड्रिंकच्या टिनमध्ये शिरला नाग

सर्पमित्राने दिले जीवदान

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

पोयंजे येथे एका कोल्ड्रिंकच्या डब्यात एक नाग शिरला. परंतु, या नागाला बाहेर येणे शक्य नव्हते. भिंगार येथील सर्पमित्र यांनी वेळेवर पोहचून नागाला अत्यंत कौशल्याने बाहेर काढून जीवदान दिले.

मयूर मुंडे यांना त्यांच्या घराशेजारी फेरफटका मारत असताना कोल्ड्रिंकच्या डब्यात सापाचे डोके दिसले. त्यांनी तातडीने याची माहिती सर्पमित्रांना दिली. माहिती मिळताच सर्पमित्र प्रतिक शेंद्रे हे आपले सहकारी अक्षय लबडे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर नागाला कोणत्याही प्रकारची इजा न होता सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. त्यानंतर या नागाला मानवी वस्तीपासून दूर सुरक्षित अशा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. ‘साप हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत, त्यांना मारू नका,’ असे आवाहन यावेळी सर्पमित्रांनी केले.

Exit mobile version