नागाव येथे नारळ फोडी स्पर्धा संपन्न

अभय पाटील यांनी पटकावला सोन्याचा नारळ
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सचिन राऊळ व राकेश राणे मित्र मंडळा आयोजित भव्य खास आकर्षक बक्षीस सोन्याचा नारळ असणारी खेळी नारळ फोडी स्पर्धा संपन्न झाली. अभय पाटील यांनी सोन्याचा नारळ पटकावत स्पर्धा गाजवली. या स्पर्धेसाठी संपूर्ण कोकण विभागांतून 48 स्पर्धक सहभागी झाले होते .

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अभय पाटील, द्वितीय क्रमांक संजय सारंग, तृतीय क्रमांक शैलेश नाईक व चतुर्थ क्रमांक शैलेश महाजन यांनी पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन सरपंच निखिल मयेकर यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी माजी सरपंच नागाव नंदकुमार मयेकर, नागाव ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र नागलेकर, श्रीकांत आठवले, प्रसाद सुतार, व्यवसायिक संतोष राऊळ, सदस्य परेश ठाकुर, माजी सदस्य विकास पिंपळे आणि मित्र परिवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या स्पर्धेत सहभागी आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यात सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे सचिन राऊळ यांनी आभार मानले.

Exit mobile version