मालवणमधील विशाल मुणगेकर महाविजेता
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पारंपारिक असलेला नारळफोडी डाव अलिबागमध्ये रविवारी (दि.26) रंगला. या स्पर्धेचा महाविजेता मालवणमधील विशाल मुणगेकर या स्पर्धेचा महाविजेता ठरला. त्यांचा डबल डोअर फ्रिज व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाच्या वतीने अलिबागमधील भंडारी भवन येथे ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कोकणातील पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देणे आणि स्थानिक खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ उद्योजक राजन नार्वेकर, विश्वस्त नरहरी धनाजी तथा तोडणकर, अध्यक्ष कमलाकर पडवळ, उपाध्यक्ष मधुकर पारकर, यशवंत राऊत, सनदी लेखापाल संजय राऊत, प्रसन्न खडपे, सरपंच प्राजक्ता खडपे, सरपंच प्रफुल्ल मोरे, माजी सरपंच सुरेश खोत, प्रशांत चिंबुलकर, तुकाराम शिलधनकर, सदस्य संतोष मोरे, राजन वाडकर, ग्रामपंचायत सदस्य साहिल रमेश पाटील, मनोहर कासेकर, दिलीप मुकादम, मुरूड अध्यक्ष दीपक मयेकर, दीपक आंबुकर, ग्रामपंचायत किहीम सदस्य संतोष कीर, जनार्दन राऊत, सुरेश खडपे, अमोल मयेकर, राजेंद्र बांदिवडेकर, भारत रांजणकर, प्रथमेश नार्वेकर, प्रफुल्ल नागवेकर, शैलेश राऊत, सचिन खेऊर, आदी उपस्थित होते.
रायगडसह कोकणातील असंख्य स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. ही स्पर्धा पहाण्यासाठी क्रीडा प्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. कोकणातील हा सर्वात महत्वाचा आणि पारंपारिक खेळ आहे. संगणकीय जगतामध्ये हा खेळ टीकून ठेवण्याचे काम आयोजकांनी केले. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण येथील विशाल मुणगेकर (चषक आणि डबल डोअर फ्रिज), द्वितीय क्रमांक वरसोली येथील किरण राऊत (चषक आणि वॉशिंग मशीन), मालवणमधील दिपक केरकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे. त्यांना चषक आणि स्मार्ट टीव्ही देऊन गौरविण्यात आले. चतुर्थ क्रमांक अलिबागमधील गजानन मोरे यांनी मिळविला असून त्यांना चषक सायकल देण्यात आली. तसेच उत्तेजनार्थ व विशएष उप पारितोषिकेही देण्यात आली. त्यामध्ये उत्कृष्ट नारळ (मायक्रो ओव्हन) किरण राऊत (वरसोली), एका नारळाने जास्तीत जास्त 13 नारळ फोडून हा विक्रम केला. उत्कृष्ट फटकेबाज (होम थिएटर) मनोज मयेकर (नागाव), उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ (कुलर) संतोष हळदणकर (मालवण) यांना गौरविण्यात आले. यावेळी रुद्रा पिळणकर हिने दांडपट्टा व लाठी काठीच्या प्रात्यक्षिक दाखवून सर्वांचे मने जिंकली.सूत्रसंचलन शुभांगी कवळे, जगदीश राऊत यांनी केले.







