• Login
Thursday, April 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

रायगडात थंडीचा कडाका; जागोजागी पेटल्या शेकोट्या

Krushival by Krushival
January 15, 2023
in अलिबाग, रायगड
0 0
0
रायगडात थंडीचा कडाका; जागोजागी पेटल्या शेकोट्या
0
SHARES
75
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । वार्ताहर ।
गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. अचानक हवामानात बदल होऊन वातावरणात कमालीचा गारवा आला आहे. सकाळी आणि रात्री बोचणारी थंडी आता दुपारीदेखील कापरे भरवत असल्याने थंडीपासून संरक्षण करण्याठी गरम कपडे घालण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. त्याचप्रमाणे थंडीपासून दिलासा मिळावा, यासाठी जागोजागी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. थंडीची मज्जा लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकही दाखल झाले आहेत.

राज्याच्या विविध भागांमध्ये थंडीची लाट आल्याने त्याचा तडाखा रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, माथेरान-कर्जत, महाड, पोलादपूर, रोहे, श्रीवर्धन, म्हसळा, तळा यांच्यासह अन्य तालुक्यांनाही बसला आहे. सकाळी थंडी अधिक असल्याने धुक्याने शहर आणि गावे चांगलीच नाहून निघत आहेत. सर्वच तालुक्यात तापमानाचा पारा घसरला असून, 15 अंश सेल्सियस इतकी नोंद झाली आहे. दरम्यान, आल्हाददायक थंडीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकदेखील दाखल झाले आहेत. नागरिकांनी थंडीपासून संरक्षण करण्यासाठी कपाटामध्ये ठेवलेले गरम कपडे बाहेर काढले आहेत. ग्रामीण भागामध्ये शेकोटी पेटवून त्याचा आनंद घेण्याचे चित्र आपण सातत्याने पाहतो. यंदा मात्र शहराच्या काही भागांमध्येही शेकोट्या पेटवल्या जात असल्याचे दिसत आहे. वाफळणार्‍या चहाचे झुरके मारत नाक्यानाक्यांवर रंगतदार गप्पांनाही चांगलेच उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार थंडीचा कडाका असाच काही दिवस राहणार असल्याने आणखी काही दिवस तरी थंडीची चांगलीच मज्जा लुटता येणार आहे. जिल्ह्यात गेले काही दिवस तापमान कमालीचे घसरले आहे. गेल्या दोन दिवसांत तर तापमान 17 अंशांपर्यंत व त्याहून खाली आल्याने बोचर्‍या थंडीचा कडाका सर्वत्र पडला असून, संपूर्ण जिल्हा गारठला आहे. वाढीस लागलेल्या या थंडीचा सामना करताना सर्वांचीच तारांबळ उडत आहे. स्वेटर, मफलर, कानटोप्या आदी गोष्टींची अचानक गरज भासू लागली असून, थंडीपासून बचाव करण्यासाठी सर्वांचीच लगबग सुरू आहे. भल्या पहाटे औद्योगिक वसाहतीत रोजीरोटीसाठी जाणार्‍या कामगारवर्गाची कडाक्याच्या थंडीत त्रेधातिरपिट उडत आहे. थंडीमुळे खोकला, सर्दी, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. थंडीचा हा कडाका आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

आगरदांडा परिसरात थंडीची प्रचंड लाट सुरू आहे. सायंकाळी 5 वाजल्यापासून गार वारे सुरू झाल्याने अंगात स्वेटर व कानटोपी घालावी लागत आहे. सध्या वालाची शेतीचा हंगाम सुरूझाल्याने गारवा अधिक प्रमाणात जाणवत आहे. थंडीचे प्रमाण वाढल्याने लोक उशिरा कामावर जात असल्याचे चित्र दिसत आहे. उबदार कपडे घेण्यासाठी मुरुड बाजारपेठेत लगबग आहे. कोकणातील पर्यटनस्थळ आणि समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांची गर्दी आहे. वातावरणात गारवा आणि रम्य उबदारपणा आल्याने पर्यटक खूप खूश आहेत. पर्यटनप्रेमी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारपट्टीवरून मोठ्या संख्येने येताना दिसून येत आहे. मुरुडमध्ये सध्या मस्त गुलाबी थंडीचा मोसम असून, तापमानाचा पारा 15.5 से. इतका खाली घसरल्यामुळे सर्वच ठिकाणी धुक्याची चादर पाहावयास मिळाली.

गेल्या तीन दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने बाजारपेठेतील व्यवहार सकाळी 10 नंतरच सुरू होताना दिसत आहेत. सायंकाळी 7.30 लाच बाजारपेठेत शुकशुकाट जाणवू लागला आहे. थंडीने स्थानिक नागरिक सकाळी घराबाहेर उशिरा पडताना दिसत आहेत.पहाटे मोकळ्या हवेत फिरायला जाणाजयांची संख्या घटली आहे. थंडीने मात्र स्थानिक फुलांचा भाव वधारलेला दिसत आहे. कापड दुकानांमध्ये ऊबदार कपडे खरेदी करण्यासाठी नागरिक दिसत आहेत.थंडीचा जोर वाढत चालल्याने आंबा, काजू बागायतदार सुखावले आहेत.

मागील काही दिवसांपासून जोरदार थंडी जाणवत आहे. त्यामुळे स्वेटर, ब्लँकेट, मफलर, कानटोप्या यासारख्या उबदार कपड्यांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. – वल्लभ धनावडे, रुद्र कलेक्शन, मुरुड

लहरी हवामानाचा नेहमीच आंबा पिकाला बसला आहे. वाढत्या थंडीमुळे उशिरा का होईना, पण आंबा पीक बहरास येणार आहे. थंडीमुळे पोषक वातावरण झाले असून, त्याचा आंबा पिकास चांगला फायदा होईल, अशी आशा आहे. – सुनील घरत, आंबा व्यावसायिक, चौल

Related

Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsonline marathi newsraigadraigad newsraigad policesocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial news
Previous Post

विश्राळी तलावात आढळला मृतदेह

Next Post

पतसंस्थांनी आर्थिक शिस्त पाळली पाहिजे- डॉ. जोशी

Krushival

Krushival

Related Posts

नवगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा
sliderhome

नवगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा

April 16, 2026
sliderhome

उद्या विकासकामांचा भूमीपूजन सोहळा

April 16, 2026
पनवेल

कळंबोलीतील ‌‘रॉयल स्टॅग बूम’ कॉन्सर्टवर वादळ

April 16, 2026
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
sliderhome

रायगडचा पारा चढला

April 16, 2026
महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
अलिबाग

महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

April 16, 2026
धरण उशाला, कोरड घशाला!
sliderhome

धरण उशाला, कोरड घशाला!

April 16, 2026
Next Post
पतसंस्थांनी आर्थिक शिस्त पाळली पाहिजे- डॉ. जोशी

पतसंस्थांनी आर्थिक शिस्त पाळली पाहिजे- डॉ. जोशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?