छोटा राजनचा सहकारी अटकेत

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
केंद्रीय अन्वेषण विभागाने छोटा राजनचा साथीदार संतोष सावंत याला सिंगापूरमधून भारतात आणलं आहे. सिंगापूरमध्ये राहणारा सावंत हा हॉटेल व्यवसायाच्या नावाखाली छोटा राजनसाठी काम करत होता. संतोष सावंत हा राजनचे आर्थिक काम पाहत होता. संतोष दोन दशकांपासून फरार होता.

संतोष सावंतला आधी सीबीआय ताब्यात घेईल, त्यानंतर त्याला क्राइम ब्रँच ताब्यात घेईल. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार सावंत यांना दिल्लीत दाखल होताच सीबीआयने ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version