| पेण | प्रतिनिधी |
‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या अभियानांतर्गत पेण तालुक्यातील 65 ग्रामपंचायतींनी गावोगाव कलश फिरवून माती आणि तांदूळ जमा केले होते. त्या अमृत कलशाचे संकलन पेण पंचायत समिती येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले.
पेण पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत कलशाच्या स्वागतासाठी स्वागत कमान उभारून पुष्पवर्षावसुद्धा केला जात होता. तालुक्यात 11 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्याने महत्त्वाची बाब म्हणजे, या कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा सहभाग नसल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाची रुपरेषा उत्तम आखली होती. हा कलश संकलनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ, विस्तार अधिकारी प्रसाद म्हात्रे, विक्रांती तांडेल, आरोग्य विभागाच्या रंजना ठाकूर-लोखंडे, कृषी विभागाच्या तेजस्विनी वर्तक यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. दिवसभरात पेण तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील ग्रामपंचायतींमधून मोठ्या उत्साहात अमृत कलश जमा करण्यात आले.
पेणमध्ये अमृत कलशांचे संकलन
