ग्रामस्वच्छतेसाठी गाव एकवटले; झिराडमध्ये सामुहिक स्वच्छता मोहीम

दिलीप भोईर यांचा पुढाकार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पावसाळा सुरु होण्याच्या मार्गावर आहे. पावसाळ्यात होणार्‍या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी झिराड येथील ग्रामस्थ स्वच्छतेसाठी एकवटले असल्याचे दिसून आले. मंगळवार व बुधवार या दोन दिवसात गावांतील गल्ली, अंतर्गत रस्ते व परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. हा कचरा गोळा करून त्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यात आली. जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच दर्शना भोईर यांच्यासह सदस्य व सर्व ग्रामस्थ, महिला सहभागी झाले होते. जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात गावांतील रस्त्यांवर व अन्य ठिकाणी पाणी साचला जातो. या पाण्यामुळे जलजन्य आजार होण्याचे प्रमाण अधिक असते. तर काही ठिकाणी पुर परिस्थितीदेखील निर्माण होते. झिराड गावांतील नागरिकांचे आरोग्य चांगले राहवे.

यासाठी रायगड जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने संपुर्ण गावात स्वच्छता मोहिम सुरु करण्यात आली. पाऊस तोंडावर आला आहे. पावसाळ्यात घाणीमुळे आरोग्यासाठी धोका संभवतो. नाले तुंबतात, रोगराई पसरण्याची भिती असते. या पार्श्‍वभूमीवर झिराड मध्ये स्वच्छता अभियान आज हाती घेण्यात आले. मंगळवारी या मोहिमेला सुरुवात झाली. बुधवारी आठ जूनपर्यंत दोन दिवस ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये सात हजारहून अधिक लोकसंख्या असलेल्या झिराड ग्रामपंचायतीमधील आदिवासी पाड्यांमधील महिला, ग्रामस्थदेखील सहभागी झाले होते. संपुर्ण गाव स्वच्छ करण्यासाठी झिराडमधील सरपंच, उपसरपंच,सदस्य, आदिवासी समाजातील महिला, पुरुष यांना बरोबर घेऊन दिलीप भोईर स्वतः या अभियानात सहभागी झाले होते.

पावसाळ्यात उद्भवणार्‍या संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून तसेच गावातीलच्या लोकांचे पावसाळ्यात आरोग्य चांगले राहवे. नागरिकांना स्वच्छतेची सवय राहवी म्हणून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून पावसाळ्यापुर्वी हा उपक्रम ग्रामस्थांच्या मदतीने राबविला जात आहे. या उपक्रमाला ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. यातून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा एक प्रयत्न आहे.

Exit mobile version