। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
साई क्रीडा व महिला मंडळ झिराड यांच्या वतीने तालुक्यातील नांदाईपाडा येथे आयोजित अलिबाग प्रीमिअर लीग या टेनिस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी करण्यात आले. युवा क्रिकेट खेळाडूंना त्यांचा खेळ दाखविण्याची संधी देण्यासाठी त्याच बरोबर सायबर क्राईम,स्वच्छता, आणि कोरोना विषयक जनजागृती करण्याच्या प्रमुख उद्देशाने आयोजित या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, समाज कल्याण समिती सभापती दिलीप भोईर, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकापच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारीबँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पाटील, झिराड ग्रामपंचायत सरपंच सौ दर्शना भोईर व परिसरातील इतर ग्रामपंचायत सरपंच उपस्थित होते. आमदार जयंत पाटील यांनी प्रकाशझोतातील या क्रिकेट सामन्याच्या अयोजनातील तयारी पाहून सभापती दिलीप भोईर आणि त्यांच्या सर्व सहकारी यांचे विशेष कौतुक केले.आज जर मी, या उद्घाटनाला आलो नसतो तर एव्हड्या चांगल्या पद्धतीने केलेल्या आयोजित कार्यक्रमाला मुकलो असतो. या शब्दहात प्रसशा केली. तसेच दिलीप भोईर यांना जी संधी दिली,त्याचे त्यांनी चीज केले,असे उदगार ही काढले. दरम्यान सामन्याच्या पहिल्या दिवशी 10 सामने खेळविण्यात आले. त्यातील 4 संघ सुपर 8 मध्ये गेले आहेत. शनिवारी पूर्व उपांत्य,उपांत्य आणि अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. आकर्षक बक्षिसांच्या या अलिबाग प्रीमिअर लीग मध्ये तालुक्यातील 16 संघ सहभागी झाले आहेत.