कर्नाटकातील महाविद्यालये गोंधळात सुरू

बुरखाधारी विद्यार्थिनींना प्रवेश न दिल्याने संताप
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

हिजाब वादामुळे आठवडाभर बंद राहिलेली कर्नाटकमधील अनेक कनिष्ठ महाविद्यालये बुधवारी पुन्हा सुरू झाल्यानंतर, बुरखाधारी मुस्लीम विद्यार्थिनींना आत प्रवेश न देण्यात आल्यामुळे तेथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.अनेक संवेदनशील ठिकाणच्या कनिष्ठ महाविद्यालयांत व त्यांच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुस्लीम विद्यार्थिनींच्या एका गटाने बुरखा किंवा हिजाब न काढण्याचा हट्ट कायम ठेवला.

उडुपी जिल्ह्यात कनिष्ठ आणि पदवी महाविद्यालये बुधवारी पुन्हा सुरू झाली. महाविद्यालयांच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून पोलीस तेथे चोख दक्षता बाळगत आहेत.हिजाबवरील बंदीच्या विरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात दाद मागणार्‍या 6 मुस्लीम विद्यार्थिनी गैरहजर होत्या, असे उडुपीच्या शासकीय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रुद्रे गौडा यांनी सांगितले. इतर मुस्लीम विद्यार्थिनींनी वर्गात जाण्यापूर्वी हिजाब काढून ठेवल्याने महाविद्यालायीतल वर्ग सुरळीत सुरू होते.

याच जिल्ह्याच्या कुंदापूर येथील शासकीय कनिष्ठ महाविद्यालयातील ज्या 23 मुस्लीम विद्याथिर्नीनी हिजाब घालण्याचा आग्रह कायम ठेवला होता, त्याही बुधवारी महाविद्यालयात आल्या नाहीत. गेल्या आठवडयात त्यांनी वर्गात जाण्यापूर्वी हिजाब काढण्यास नकार दिल्यामुळे त्यांना वेगळया वर्गात बसवण्यात आले होते. उडुपीतील मणिपाल येथील एमजीएम महाविद्यालायतील वर्ग बुधवारी सुरू झाले नाही. गेल्या आठवडयात विद्यार्थ्यांच्या गटांनी एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्यामुळे येथे अनागोंदी माजली होती. अधिकार्‍यांनी बुधवारी महाविद्यालयाला सुटी जाहीर केली होती.अज्जारकाड येथील जी. शंकर महिला महाविद्यालयात मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब काढून वगार्त जाण्याची परवानगी देण्यात आली. ज्यांनी यास नकार दिला, त्यांची वेगळया वर्गात व्यवस्था करण्यात आली.

Exit mobile version