| पनवेल | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या राज्य उपाध्यक्षा ज्योत्स्ना भरडा यांच्याकडून एलिमेंटरी परीक्षेला बसलेल्या दीडशे विद्यार्थ्यांना मोफत रंगपेटी देण्यात आली. दि. बा. पाटील विद्यालयात रंगपेटी वाटपाचा कार्यक्रम झाला. राज्य शासनातर्फे चित्रकला ग्रेड अर्थात एलिमेंटरी परीक्षा होणार आहे. होतकरु विद्यार्थ्यांना परीक्षेस बसता यावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी रंगपेटीचे वाटप करण्यात आले. गरिब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी ज्योत्स्ना भरडा नेहमीच दानशूर भूमिका निभावत असतात. त्यांचे अनुकरण इतरांनीही करावे अशी अपेक्षा प्राथमिक शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी व्यक्त केली. यावेळी वैभव पाटील, प्रमोद लांगी उपस्थित होते. एलिमेंटरी परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. जास्तीत जास्त विद्यार्थी यात सहभागी व्हावे,यासाठी आणखी 265 विद्यार्थ्यांना चित्रकला वही, ब्रश, कलर डिश देणार असल्याचे श्रीमती भरडा यांनी सांगितले.