। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत नवरात्री उत्सवाचे व ईद ए-मिलाद सणाच्या अनुषंगाने शेडुंग टोल नाका येथे मंगळवारी दंगा काबू योजनेची रंगीत तालीम पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
दंगा काबू योजनेत रंगीत तालीममध्ये पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निरिक्षक, पाच सहाय्यक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक, 26 पुरूष/महिला पोलीस अंमलदार हजर होते. तसेच नवीन पनवेल वाहतूक शाखेचे दोन पोलीस अंमलदार, नवीन पनवेल फायर ब्रिगेडचे एक अधिकारी, चार कर्मचारी, अॅम्ब्युलन्सवरील कर्मचारी, बिट मार्शलचे पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
नवरात्री उत्सव सणाचे व ईद ए-मिलाद सणाच्या अनुषंगाने आयोजित दंगा काबू योजनेची रंगीत तालीम शेडुंग टोल नाका येथे पार पडल्याने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास हे पथक अवघ्या काही वेळेतच त्या ठिकाणी दाखल होऊन तेथील परिस्थिती सुरळीतपणे हाताळेल, अशी माहिती अधिकारी वर्गाने दिली आहे.