| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील पुगाव गावातील तीन कुटुंबांतील व्यक्तींचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी शनिवार, दि.9 एप्रिल रोजी सांत्वनपर भेट घेतली. रोहा तालुक्यातील काही दिवसांपूर्वी तसेच आ. जयंत पाटील यांचे हितचिंतक पुगाव येथील नारायण शंकर खामकर, रविकांत सदाशिव शेळके, विमल रामचंद्र देशमुख यांचे आकस्मिक निधन झाले. त्या प्रित्यर्थ या तिन्ही कुटुंबांतील व्यक्तींच्या घरी जाऊन आमदार जयंत पाटील यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी पुगावचे ज्येष्ठ नेते नारायणराव धनवी, ग्रामपंचायत सदस्य गणेश म्हसकर, बबन म्हसकर, खांब विभागीय नेते मारुती खांडेकर, रोहा तालुका चिटणीस राजेश सानप, माजी सरपंच मनोहर महाबळे, नारायण अधिकारी, जनार्दन खामकर, महादेव खामकर, अनंता खामकर, रुपेश अधिकारी, अनंता धाडसे, विनायक म्हसकर व समस्त पुगाव ग्रामस्थ यांच्यासमवेत उपस्थित होते.