शेतकर्यांनी स्वकष्टाने बसविले दरवाजे
। कापोली । वार्ताहर ।
सततचा होणारा त्रास आणि शासन करत असलेले दुर्लक्ष यामुळे आता स्थानिक शेतकरीच पुढाकार घेऊन स्वकष्टाने दरवाजे बसवण्याचे काम जीव धोक्यात टाकुन करीत आहेत. त्यामुळे खार जमिन धारकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पण दरवर्षी होणारा त्रास शासनाने कायमचा निकाली लावावा अशी मागणी शेतकर्यांमधुन होऊ लागली आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील वडवली दिवेआगर बोर्लीपंचतन परीसरात असणार्या खारजमिनी गेल्या अनेक वर्षांपासून वर्षानुवर्षे अश्याच पडुन आहेत. कारण समुद्राच्या भरतीचा पाणी दरवाजे उत्साही मासेमारी करण्यासाठी येणार्या मच्छिमारांनी तोडल्याने खारजमिनीत शिरत असल्यामुळे मालकांचा नुकसान होतो. मेहनत करुन देखील खारजमिन पिकत नाही. समुद्रातुन येणार्या खार्या पाण्यामुळे लोक अक्षरशः मेटाकुटीस येऊन शेवटी खारीशेती पिकवायच्या सोडुन दिल्या आहेत. शासनाने याबाबत गांभीर्याने पावले उचलून खार जमीन धारकांना वाचवण्याची गरज आहे.
दरम्यान शासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्यामुळे दिवेआगर सात उघडीचे दरवाजे बसवताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अविनाश हतिसकर, तसेच शेतकरी संघटनेचे सदस्य प्रमोद चाळके तसेच दिवेआगर येथील संदीप बाळा वाणी, सुबोध वाणी, श्रीकांत विरकुड, रमेश भगत, आशिष भगत, बाळू धनावडे, बाबू भगत, समीर वाणी, रूपेश कोसबे तसेच आणि काही शेतकरी तुटलेले दरवाजे बसवताना दिसत आहेत. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून खार जमिन धारकही आभार व्यक्त करीत आहेत.