बॅ.ए.आर.अंतुले यांचा स्मृतिदिन साजरा

| म्हसळा | वार्ताहर |

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांचा आठवा स्मृतिदिन सोहळा म्हसळा येथील वसंतराव नाईक कला, वाणिज्य आणि बॅ.ए.आर.अंतूले विज्ञान महाविद्यालयात साजरा करण्यात आला. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी बॅ.ए.आर.अंतुले यांच्या कार्याचा गौरव केला. स्मृती दिनाचे औचित्य साधून 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच, तालुक्यातील 100 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या स्मृतिदिनास समीर बनकर, नासिर मिठागरे, फझल हालडे, महादेव भिकु पाटिल, नीलम वेटकोळी, प्रदिप कदम, नाझिम डावरे, रियाज घराडे, अहमद अली पेनकर, निजाम कागदी, नासिर मिठागरे, निलम वेटकोळी, शाहिद उकये, प्राचार्य दिगंबर टेकळे, शकूर घनसार, रामदास कांबळे, कासीम खानजादे, शब्बीर झटाम, लक्सक्षुमन जुजूम, गंगाराम डोंगरे, शब्बीर मुरतूजा, रफिक घरटकर, शब्बीर काझी, अशफाक खामकर, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.के.एस.भोसले यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य दिगंबर टेकळे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version