गणपतराव देशमुख यांचे उद्या पुण्यसमरण

आ. जयंत पाटील यांची उपस्थिती
। सांगोला । प्रतिनिधी ।
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार व सांगोल्याचे माजी आमदार स्व. गणपतराव देशमुख यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शनिवारी (दि.30) दुपारी बारा वाजता सांगोला सूत गिरणीच्या प्रांगणात पुष्प समर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने शेतकरी व शेतमजुरांचा मेळावादेखील होणार आहे.

या मेळाव्यास शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार असून माजी आमदार रामहरी रुपनवर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी नागरिकांनी पुष्पवृष्टी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका सरचिटणीस दादाशेठ बाबर यांनी केले आहे .

Exit mobile version