| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागचे थोर तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांच्या 75 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शनिवारी (दि.13) जानेवारी रोजी सकाळी ज्येष्ठ नागरिक तथा पुतळा सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष श्रीरंग घरत यांच्या हस्ते त्यांच्या अलिबाग येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. पोलीस पाटील तथा झिराड येथील पाठारे क्षत्रिय अष्टागार समाजाचे खजिनदार विकास पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक, ज्येष्ठ नागरिक संस्था भालनाकाचे अध्यक्ष श्रीरंग घरत तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. तर आभार पाठारे क्षत्रिय अष्टागर समाज, झिराडचे खजिनदार विकास हरिश्चंद्र पाटील यांनी मानले. ज्येष्ठ नागरिक संस्था अलिबागचे अध्यक्ष प्रफुल्ल राऊत, उद्योजक गजेंद्र दळी, उमाजी केळुसकर, अरविंद घरत, नवीन राऊत, बिपीन राऊत, नागेश कुळकर्णी, भालचंद्र वर्तक, संजय कांबळे, हेमकांत सोनार, जगदीश नागे, डॉ. श्रीकांत पाटील, अरुण पाटील, विकास खोपकर, साधना पाटील, साक्षी काठे, पूजा काठे, प्रसाद काठे, नंदू थळकर, सुधाकर राऊत आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.







