| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील शेलू गावाची ग्रामदैवत असलेली आई भवानी मातेचा उत्सव साजरा होत आहे. हा उत्सव आठ दिवस चालणार असून, परिसरातील लोकांसाठी हा उत्सव मनोरंजनाचा ठरणार आहे.
शेलू गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या माळरानावर आई भवानी मातेचे लहानसे मंदिर आहे. गावाच्या चारही दिशेला अशी मंदिरे असून, त्यापैकी कल्याण-कर्जत रस्त्याच्या पलीकडील भागात भवानी मातेचे मंदिर आहे. एका जांभळीच्या झाडाखाली आई भवानी माता विसावली असून, ते झाड शतकाहून अधिक जुने आहे. गावातील तरुण कार्यकर्ते समीर मसणे आणि हिसाळगे यांनी एकत्र येत आठ वर्षांपूर्वी देवीचा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. यावर्षी 14 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत देवीचा यात्रा आहे. आई भवानी जत्रा उत्सवसाठी मंदिर आहे. त्या ठिकाणच्या पाच एकरहून अधिक मोकळ्या जागेत पाळणे आणि झोपाळे तसेच मनोरंजनाचे अनेक खेळांची मांडणी करण्याचे काम सुरु आहे. या यात्रा उत्सव काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा तसेच सांस्कृतिक सपर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे. तर तरुणवर्गासाठी रक्तदान शिबीरदेखील भरवले आहे. देवीचा महाभांडारा आयोजित केला जाणार आहे. त्या दिवशी सत्कार सोहळा आणि सांस्कृतिक तसेच भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, 21 जानेवारी रोजी रक्तदान शिबीर होणार आहे, अशी माहिती आयोजक आई भवानी माता उत्सव मंडळाचे समीर मसणे आणि अक्षय हिसालगे यांनी दिली आहे.