। तळा । वार्ताहर ।
तळा नगरपंचायत हद्दीतील तब्बल तीन कोटी रुपयांचे 21 विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा रायगडचे लोकप्रिय खा.सुनील तटकरे यांच्या भहस्ते तळा शहरात पार पडले.
या भूमिपूजन कार्यक्रमा नंतर पार पडलेल्या जाहीर सभेत खा.सुनील तटकरे यांनी तळाशहरासाठी पाणी योजना, नाट्यगृह, एसटी स्टँड आणि सुसज्ज तळा नगरपंचायत उभारणार असल्याची ग्वाही तळे वासियांना दिली .
या जाहीर सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तळा तालुका अध्यक्ष नाना भौड, शहर अध्यक्ष महेंद्र कजबजे,महिला अध्यक्षा जान्हवी शिंदे, नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,माजी बाल कल्याण सभापती गीता जाधव,मागासवर्गीय सेल रायगड जिल्हा अध्यक्ष ड.उत्तम जाधव,युवक अध्यक्ष नागेश लोखंडे,कैलास पायगुडे, किशोर शिंदे, प्रवीण अंबारले सर्व नगरसेवक नगरसेविका आणि तळेवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक शहर अध्यक्ष महेंद्र कजबजे यांनी केले तर आभार उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी मानले.कार्यक्रमासाठी तळा शहरवासीयांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.







