थेरोंडाफाटा येथे रस्ता क्राँकिटीकरणाचा प्रारंभ

। रेवदंडा । प्रतिनिधी ।
रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीचे विदयमाने थेरोंडा पानसेवाडी येथील थेरोंडा फाटा ते रामचंद्र गौरू पाटील यांचे निवासस्थान या दरम्यानच्य रस्ता क्रॉकिटकरणाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी सरपंच मनिषा चुनेकर, माजी उपसरपंच सदाशिव मोरे, माजी ग्रा.प.सदस्य सुरेश खोत, रेवदंडा ग्रा.प.माजी सरपंच सुरेश घरत(कोटकर)व ग्रा.प.सदस्य संतोष मोरे, संदिप खोत, ग्रा.प.सदस्या चेरकर, मुज्जफर मुकादम,शरद वरसोलकर, निलेश खोत, मानकर, तसेच थेरोंडा पानसेवाडी ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.


शेकापक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते सदाशिव मोरे, व सरपंच मनिषा चुनेकर यांचे हस्ते श्रीफळ वाढवून नुतन रस्ता क्रॉकिटीकरणाचे भुमिपुजन करण्यात आले. त्यानंतर ग्रा.प.सदस्य संदिप खोत, यांचे हस्ते सरपंच मनिषा चुनेकर, सदाशिव मोरे, आदीचा पुष्पगूच्छ प्रदान करून स्वागत करण्यात आले.
थेरोंडा पानसेवाडीत जात असलेल्या थेरोंडा फाटा ते रामचंद्र गौरू पाटील यांचे निवासस्थान या दरम्यानच्या नुतन रस्ता क्रॉकिटीकरण शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड. अस्वाद पाटील यांचे जिल्हा नियोजन निधीतून ग्रामपंचायत सदस्य संदिप खोत व संतोष मोरे यांचे पाठपुरावाने करण्यात येत आहे. यावेळी ग्रामपंचायत वार्ड क्रमांक पाच मध्ये विविध विकास कामाची पुर्तता येथील ग्रा.प. सदस्य संतोष मोरे, ग्रा.प.सदस्य संदिप खोत, व ग्रा.प.सदस्या चेरकर यांचे प्रयत्नातून केले जात आहेत.

Exit mobile version