। रेवदंडा । प्रतिनिधी ।
रेवदंडा ग्रामपंचायतीच्या प्रभाग पाच मधील रिक्तपदावर घेण्यात आलेल्या पोटनिवडणूकीत शेकापक्षाच्या सुर्वणा योगेश चेरकर या बिनविरोध निवडून आल्या. त्यामुळे शेकापक्षाच्या वतीने नवनिर्वाचीत सदस्या सुवर्णा चेरकर यांचा विशेष सत्कार कार्यक्रम रेवदंडा ग्रामपंचायतीत आयोजित करण्यात आला होता.
यावेळी रेवदंडा शेकापक्षाचे ग्रा.प.सदस्य राजन वाडकर, ग्रा.प.सदस्य खलिल तांडेल, ग्रा.प.सदस्य संतोष मोरे, ग्रा.प.सदस्य संदिप खोत, ग्रा.प.सदस्य शरद गोंधळी, माजी ग्रा.प.सदस्य सुरेश खोत, मुज्जफर मुकादम, सलिम तांडेल, योगेश चेरकर, मानकर, ग्रामसेवक दिवकर आदीची उपस्थिती होती.
प्रारंभी शेकापक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी ग्रा.प.सदस्य सुरेश खोत यांच्या हस्ते नवनिर्वाचीत ग्रा.प.सदस्या सुवर्णा चेरकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ग्रा.प.सदस्य राजन वाडकर, संतोष मोरे, खलिल तांडेल, शरद गोंधळी आदी शेकापक्षाच्या ग्रा.प.सदस्यांनी नवनिर्वाचीत सदस्या सुवर्णा चेरकर यांचे स्वागत पुष्पगूच्छ प्रदान करून केले.