वाघ्रण घरगुती पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ

। वाघ्रण । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील वाघ्रण येथे शासनाच्या जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेतंर्गत घरगुती नळ पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ 10 फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. त्या ग्रामस्थांनी शेकाप आमदार जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, जिल्हा परिषद प्रतोद अ‍ॅड. आस्वाद पाटील, याच्या प्रयत्नाना धन्यवाद दिले.
यावेळी सरपंच डॉ. प्रेरणा पाटील, ग्राम पंचायत सदस्य दिपक पाटील, रुपेश पाटील, मीना म्हात्रे, गीता पाटील,बाळकृष्ण पाटील, संजय पाटील, विवेक पाटील, माजी उपसरपंच उदय पाटील,अविनाश म्हात्रे, गजानन पाटील, दयानंद म्हात्रे, जयंवत पाटील,भूषण धोदरे, क्षितीज पाटील, मनिषा म्हात्रे, नथुराम पाटील, नरेश पाटील, अनुसया पाटील, सर्वेश ठाकूर व ग्रामस्थ अपस्थित होते.

Exit mobile version