शेकाप नेते जयंत पाटील, अतुल म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील वाघ्रण येथून प्रसिद्ध होणार्या त्रैमासिक रायगड मित्रच्या 15 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन शेकापच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील तथा चिऊताई यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी शेकाप नेते माजी आमदार जयंत पाटील, पेणचे अतुल म्हात्रे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वाघ्रण येथील रायगडभूषण पत्रकार आणि रायगड मित्र अंकाचे संपादक दिपक यशवंत पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. दिवाळी अंकाबद्दल थोडक्यात मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संपादक व रायगड मित्र विशेषांकाला शुभेच्छा दिल्या. या प्रकाश सोहळ्यानिमित्त वाघ्रणचे सरपंच राजेंद्र पाटील, ललिता पाटील, पेढांबे ग्रा.पं. सदस्य रुपेश पाटील, सदस्य कैलास म्हात्रे, अनिल पाटील, सेवानिवृत मुख्याध्यापक संघटना जिल्हा अध्यक्ष श्रीकांत पाटील, वाघ्रणचे माजी सरपंच उदय पाटील, पत्रकार जीवन पाटील, पेझारी येथील किशोर पाटील सर, मानकुळे ग्रा.पं. माजी सदस्य भरत पाटील, मनसे कार्यकर्ते मुरलीधर पाटील, वाघ्रण येथील शेकाप कार्यकर्ते गिरीश पाटील, संजय पाटील, दयानंद म्हात्रे, तुकाराम पाटील, निरीक्षक प्रमोद पाटील, आदर्श पाटील, क्षितिज विवेक पाटील आदी उपस्थित होते.