आ.रमेश पाटील यांच्याकडून 15 लाखाचा निधी उपलब्ध
| आगरदांडा | वार्ताहर |
मुरुडमधील मासळी शेडच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. यासाठी आ.रमेश पाटील यांच्या विकासनिधीतून 15 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
चक्री वादळामुळे सदरची शेड जमीनदोस्त झाली होती. सदरची शेड लवकरात लवकर नवीन बांधण्यासाठी रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले, सागर कन्या मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर मकू, सागर कन्या सोसायटीचे महिला सदस्य अरुणा मकु, मंगला नांदगावकर, सजवला कुलाबकर, गीता कुलाबकर व सदस्य यांनी आमदार रमेशदादा पाटील व चेतनदादा पाटील याना भेटून वादळात पडलेली शेड दाखवण्यात आली. सदरची शेड बांधून मिळण्याची विनंती सागर कन्या मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर मकू यांनी केली.
मच्छिमार सोसायटीच्या समाजबांधवांची विनंती मान्य करून आ रमेश पाटील व चेतन पाटील यांनी आमदार निधीमधून तात्काळ 15 लाख रुपये मंजूर केल्यामुळे सध्या या कामाला सुरुवात झाली आहे. सागर कन्या मच्छिमार सोसायटी तर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.