| महाड | प्रतिनिधी |
महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कार्यकौशल्यामुळे हरवलेली महिला व तिची दोन मुले अखेर सुखरूप सापडली. याबाबत 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास सपोनि श्री. माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा मोहिते यांनी केला. तर, तांत्रिक तपास पोकॉ. बल्लाळ यांनी पार पाडला. उपलब्ध माहिती, तांत्रिक साधनांचा वापर, कॉल लोकेशन, सिसीटीव्ही फूटेज तसेच विविध ठिकाणांवरील तपासणीच्या आधारे पथकाने पुणे शहरात शोधमोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान मिसिंग महिला श्रुती अमोल राऊत (25) आणि तिची दोन लहान मुले आयुष व विर यांचा शोध यशस्वीरित्या लावण्यात पोलिसांना यश आले. पुणे येथे त्यांचा मागोवा लागताच पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी पोहोचून तिघांना सुरक्षित ताब्यात घेतले.सोमवार, दि. 08 डिसेंबर रोजी महाड एमआयडीसी पोलीस पथकाने श्रुती राऊत व तिची मुले यांना तिच्या नातेवाईक तसेच पती अमोल राऊत यांच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द केले. महाड एमआयडीसी पोलिसांनी दाखवलेली तत्परता, तांत्रिक तपासाचे कौशल्य आणि वेळीच केलेला हस्तक्षेप यामुळे एक कुटुंब पुन्हा एकत्र आले असून, नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.







