सैनिकी स्कूल परीक्षेतील यशाचे कौतुक

। पनवेल । वार्ताहर ।

सैनिकी स्कूलच्या खडतर परीक्षेत यश संपादन करून देशभरामध्ये विविध शाळांमध्ये प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्यावतीने नुकताच गुणगौरव करण्यात आला. या प्रशिक्षण केंद्रामध्ये अभ्यास करून या मुलांनी यश मिळवले. त्यांच्या पाठीवर एक प्रकारे कौतुकाची थाप देण्यात आली.

देशभरामध्ये विविध शहरांमध्ये सैनिकी स्कूल आहेत. अत्यंत दर्जेदार शिक्षण, त्याचबरोबर शिस्तप्रियता, देशप्रेम याव्यतिरिक्त आयएएस, आयपीएस आणि एनडीएमध्ये जाण्यासाठी खडतर प्रशिक्षण आणि शिक्षण देणार्‍या या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळत नाही. त्यासाठी दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतली जाते. प्रचंड स्पर्धा आणि त्याचबरोबर अत्यंत अवघड ही परीक्षा असते. कळंबोली येथे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना यासाठी तयार केले जाते. त्यांना अभ्यासक्रम शिकून त्यांची पूर्णपणे तयारी करून घेतली जाते. आय कॅन या संस्थेने अनेक विद्यार्थी आजपर्यंत घडवले आहेत. एक नामांकित प्रशिक्षण संस्था म्हणून देशभरामध्ये या इन्स्टिट्यूटचे नाव घेतले जाते. देशभरातील जवळपास प्रत्येक सैनिकी शाळेमध्ये आय कॅनने घडवलेले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये कळंबोली येथील केंद्र हे आघाडीवर आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात सैनिकी स्कूल परीक्षेमध्ये विद्यार्थी यशस्वी होतात. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याच्या उद्देशाने त्याचबरोबर या पुढील वर्षांमध्ये परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कळंबोलीच्या संचालिका सीमा जगताप यांनी सैनिकी स्कूल मार्गदर्शन आणि विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे कळंबोली येथील ससून हॉलमध्ये आयोजन केले होते.

Exit mobile version