सहज सेवा फाउंडेशनचा उपक्रम
| खोपोली | वार्ताहर |
सहज सेवा फाऊंडेशनच्या वतीने 60 जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा श्रीराम मंगल कार्यालय, खोपोली येथे आयोजित करण्यात आला. याचवेळी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या सूचनेप्रमाणे या लग्न सोहळ्यात सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा हे सांगण्यासाठी जनजागृती करण्यात आली. आदिवासी व अन्य विविध समाजातील 60 जोडप्यांनी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा संकल्प सोडला.
या विवाह सोहळ्यातील नव वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्रातील सहज सेवा फाऊंडेशनचे पदाधिकारी व रायगड जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व जोडप्यांना कन्यादान रुपात संसार उपयोगी साहित्य मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आल्या.लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे बाळाराम म्हात्रे यांनी प्रमूख पाहुणे म्हणून संबोधित करताना सांगितले की, सामुदायिक विवाह सोहळ्याची समाजाला गरज आहे. समाजातील विविध घटकांनी यासाठी पुढे यायला हवे असा आशावाद व्यक्त केला. सर्व मान्यवरांनी सहज सेवा फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले.सहज सेवा फाऊंडेशन च्या माध्यमातून 200 पेक्षा अधिक जोडप्याचा विवाह संपन्न झालेला आहे. पुढील वर्षी सुद्धा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येईल असे प्रतिपादन सहज सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहज सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी, उपाध्यक्षा इशीका शेलार, सचिव अखिलेश पाटील, सह सचिव नम्रता परदेशी, खजिनदार संतोष गायकर, सह खजिनदार बनिता साह ,महिला संघटक निलम पाटील, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी, खालापूर तालुका प्रमुख मोहन केदार, मार्गदर्शक राजेंद्र फक्के, सल्लागार नरेंद्र हर्डीकर, गणेश राक्षे, दिवेश राठोड, उबेद पटेल, अशोक ठकेकर, तुषार अगरवाल, आश्पाक लोगडे, प्रसन्न त्रिभूवन, सुमन शर्मा, नकुल देशमुख, सागरिका जांभळे, दमण सिंघ, रितेश मयेकर, चंद्रप्रकाश उपाध्याय, राजेश धोत्रे, शिवा शिवचरण, राहुल ओव्हाळ, योगिता जांभळे, रेखा भालेराव, निहारिका जांभळे, आरती परदेशी, साहिल जांभळे, पूनम तेलवने, सोहम ढोकळे, सलमान शेख व पदाधिकारी यांनी अथक मेहनत घेतली. यावेळी सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी सहकार्य करणार्या सर्वांचा सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकी भालेराव यांनी केले.