खांब येथे समाज बैठक

| गोवे-कोलाड | वार्ताहर |
कुणबी समाजोन्नती संघ मुबंई संलग्न ग्रामीण शाखा रोहा विभागीय ग्रुप खांबची सभा माता खामजाई मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. विभागीय अध्यक्ष रामचंद्रजी चितळकर यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गावागावात गाव बैठका घेऊन समाज गठित करून समाजातील तरुण युवा पिढीत अधिक जनजागृती निर्माण करून समाज संघटना वाढीवर बळ देण्यासाठी सर्व समाज बांधव एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. 13 जानेवारी रोजी रोहा तालुक्यात कुणबी जोडो अभिमान या कार्यक्रमाबाबत विशेषतः या सभेचे आयोजन खांब येथे करण्यात आले होते.

यावेळी धनाजी लोखंडे, बाबुराब बामणे, मारुती खांडेकर, वसंतराव मरवडे, शंकर मरवडे, रामचंद्र मरवडे, सदानंद जाधव, नथू जाधव, तुकाराम कोंडे, संदीप महाडिक, गजानन बामणे, नामदेव मरवडे, नथू शिंदे, खामकर, सखाराम कचरे, अनंत लोखंडे, दगडू लाडगे, सह खांब, नडवली, तळवली, चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे, शिरवली, आदी विभागातील ग्रामस्थ कुणबी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version