रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघ आयोजित स्पर्धा

पोयनाडच्या ना.ना. पाटील हायस्कूलचे यश
। पेझारी । वार्ताहर ।
रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे वार्षिक शैक्षणिक कृतीसत्र दि. 8 व 9 एप्रिल रोजी सु.ए.सो.चे के.आ. बांठिया माध्यमिक विद्यालय व एन.एन. पालीवाला उच्च माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल येथे संपन्न झाले. या कृतीसत्रांमध्ये मुख्याध्यापक संघामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये को.ए.सो. ना.ना. पाटील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पोयनाडने घवघवीत यश संपादन केले
यामध्ये को.ए.सो. ना.ना. पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पोयनाड- हस्तलिखित – प्रथम क्रमांक, निबंध स्पर्धा- प्रशिक्षित पदवीधर गट – संध्या दिवाकर खरसंबळे- प्रथम क्रमांक, तर चित्रकला स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावी गटात पायल सतीश देशमुख ही द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. सर्व पारितोषिक विजेत्यांचे आणि हस्तलिखित मार्गदर्शक देवेंद्र पाटील व सहभागी शिक्षकांचे शाळेचे चेअरमन माजी आमदार पंडित पाटील, शाळा समिती सदस्य सुप्रभात पाटील, सुमना पाटील, यशवंत पाटील, प्रा. के.के. फडतरे, सत्रप्रमुख एस.के. पाटील, व्ही.डी. पाटील, तृप्ती पिळवणकर, तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन केले.

Exit mobile version