खोपोली | वार्ताहर |
आम्ही खोपोलीकर संघटनेतर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर शनिवारी (20 नोव्हेंबर )सकाळी 11 वाजता ठाकूर सभागृहात आयोजित करण्यात आले असून माथेरानच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्यासह प्रा.अन्वर पटेल हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी तहसिलदार आयुब तांबोळी, नगराध्यक्षा सुमन औसरमल,माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर,पोलीस निरीक्षक शिरीष पवार उपस्थित राहणार आहेत.