। अलिबाग । वार्ताहर ।
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण 1 लाख 73 हजार 938 लाभार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी 1 लाख 43 हजार 223 लाभार्थ्यांची आधारकार्डची माहिती पी.एम.किसान पोर्टलवर नोंदविण्यात आली आहे. केंद्र शासनाकडील नवीन नियमानुसार पात्र लाभार्थ्यांचा पी.एम.किसान योजनेचा लाभ हा त्यांचे आधारकार्ड लिंक असलेल्या बँक खात्यातच जमा केला जाणार आहे. त्यामुळे नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना पी.एम.किसान पोर्टलवर ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून शेतकर्यांना ई-केवायसी पात्र लाभार्थ्यांनी दि.31 जुलै 2022 अखेरपर्यंत ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.