दिनेश पाटील यांची सेवापूर्ती

| अलिबाग | प्रतिनिधी |

कुरुळ येथील सामाजिक कार्यकर्ते, हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्व दिनेश कृष्णा पाटील वयाच्या 58 व्या वर्षी आपल्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर न्यायखात्याच्या अस्थापनावरून सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच सुरूची रिसॉर्ट कुरुळ येथे संपन्न झाला.

या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून मुंबई येथील नामांकित सरकारी वकील ॲड. प्रदीप घरत उपस्थित होते. यांच्या समवेत व्यासपीठावर जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष पवार, माजी जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रसाद पाटील, सरकारी वकील पेण ॲड. सतीश नाईक, गजानन पाटील, उत्तम धीवरे, यु. बी. बुरान, जे. पी. सदाफुले, के. डी. पाटील, हरीचंद्र पाटील, श्रीकांत पाटील, अलका पाटील, ॲड. विनीत पाटील, पर्णवी पाटील, अमोल नाईक आणि इतर मान्यवर, नातेवाईक, पाटील कुटुंबिय आणि कुरुळ ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. प्रदीप घरत यांनी संगितले की, खरतर प्रत्येकाच्या आयुष्यात सेवानिवृतीचा दिवस हा येतोच, फक्त निवृत्तीचे प्रकार वेगवेगळे असतात. शासकीय नियमानुसार वयाची 58 वर्ष पूर्ण झाली की आपण सेवेतील कार्य करणे थांबवतो यालाच विशेष करून निवृत्ती असे म्हंटले जाते.

निवृत्ती नंतरचे आयुष्य म्हणजे पूर्ण विराम नसून स्वल्प विराम असतो, आयुष्यातील एक नवा टप्पा असतो, स्वत:च्या आनंदाचा नव्याने शोध घेण्याची प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू होते असे सांगून कौटुंबिक काही किस्से सांगितले आणि या पुढील आपले आयुष्य आनंदाने निरोगी आणि सुखी समाधानाने जावे अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रसाद पाटील आणि पेण येथील सरकारी वकील ॲड. सतीश नाईक यांनी त्यांचे बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तर जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष पवार यांनी शाळेपासूनची मैत्री ते आता पर्यंतचा ऋनांनुबंधा वर भाष्य केले.

सत्कार मूर्ति दिनेश पाटील यांनी आपल्या जीवनातील 58 वर्षातील कौटुंबिक आणि नोकरीतील आजवरचा झालेला प्रवास आणि सामाजिक कार्य यांना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा नाईक यांनी तर प्रास्ताविक अँड. विजय पाटील यांनी केले.

Exit mobile version